नवी दिल्ली : देशातील संगणकीय क्रांतीचे प्रणेते आणि भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 26 वी पुण्यतिथी. यानिमित्त राजीव गांधी यांना देशभरात श्रद्धांजली वाहण्यात येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीत राजीव गांधी यांच्या वीरभूमी या समाधी स्थळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अंसारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.


 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरांम्बुदूर इथं निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या सभेत राजीव गांधी यांची बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. एलटीटीई अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेनं ही हत्या घडवून आणली होती.