टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून प्रवाशानं ट्विटरवर केली तक्रार आणि...
एका टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून एका प्रवाशानं ट्विटरवरून त्याची तक्रार केली... आणि आश्चर्य म्हणजे त्याची ही तक्रार तितक्याच तत्परतेनं आणि गंभीरतेनं घेतली गेली.
जयपूर : एका टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून एका प्रवाशानं ट्विटरवरून त्याची तक्रार केली... आणि आश्चर्य म्हणजे त्याची ही तक्रार तितक्याच तत्परतेनं आणि गंभीरतेनं घेतली गेली.
बाडमेरहून कालका जाणाऱ्या ट्रेनच्या आरक्षित कोचमध्ये विना आरक्षण प्रवास करत असलेल्या एका प्रवाशीकडून 15 रुपये घेतले... त्याची पावती मात्र त्याला दिली गेली नाही. हे एकाच प्रवाशाच्या नाही तर अनेक प्रवाशांच्या बाबतीत घडत होतं.
एका प्रवाशानं 15 रुपयांची पावती मागितली. पण टीटीईनं मात्र ते देण्यास नकार दिला. यामुळे प्रवाशानं ट्विटरवरच ही तक्रार नोंदवली. चौकशी विजिलेन्सला सोपवण्यात आली आणि थोड्याच वेळात विजिलेन्स टीन मेडतामध्ये पोहचलेल्या ट्रेनमध्ये चढली.
त्यांनी टीटीई शामलाल याला चौकशीकरता ताब्यात घेतलं. चौकशी अहवाल डीआरएमला सोपवण्यात आला... आणि डीआरएमनं त्वरीत कारवाई करत टीटीला मेडतामध्येच निलंबनाचे आदेश हातात दिले.
रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींची इतक्या तप्तरतेनं दखल घेतल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचं कौतुकच व्हायला हवं.