नवी दिल्ली : ही धक्कादायक बातमी आहे देशातील वायू प्रदूषणासंदर्भात. प्रदुषणाच्या विळख्यात भारतीय घुसमटत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायू प्रदूषणामुळे तर नागरिकांना श्वास घेणंही कठीण बनलंय. दर मिनिटाला सरासरी दोन भारतीयांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय क्षेत्रातील द लॅन्सेट या नियतकालिकाच्या अहवालातून समोर आलीय. 


एक दशलक्षापेक्षा अधिक भारतीय नागरिक दूषित हवेमुळे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच, अनेक भारतीय शहरं प्रदूषित झाल्यानं ती जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.


भारतातील पाटणा आणि नवी दिल्ली ही दोन शहरं सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलंय. जगात 2.7 ते 3.4 दशलक्ष गर्भांवर त्याचा दुष्परिणाम होतो. याच प्रकारात भारतात 1.6 दशलक्ष गर्भांवर परिणाम होत असल्याचंही या नियतकालिकानं म्हटलंय. 


वायु प्रदूषणाचे प्रमाण 2.5 पीएम इतके आहे. या बाबींचा सर्वाधिक धोका मानवी हृदयाला होतो तसंच, यामुळे जगात 18 हजार व्यक्ती दररोज मृत्युमुखी पडत असतात. तर हवा प्रदूषित करण्यात कोळशावर आधारित उद्योगांचा ५० टक्के वाटा असतो.