लखनौ : मायावतींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेत्याची पक्षाने हकालपट्टी केली. भाजपचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणावरून बुधवारी राज्यसभेमध्ये गदारोळ उडाला. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या तिकीट वाटप पद्धतीवर दयाशंकर सिंह यांनी टीका केली. त्याचवेळी मायावती यांची तुलना त्यांनी वारांगनेशी केली. 


दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजप निराश झाला आहे. त्यांची निराशाच यासारख्या वक्तव्यांमधून दिसून येते, असे मायावती यांनी म्हटले आहे.


दयाशंकर सिंह यांना तातडीने अटक करा. जर यामुळे उत्तर प्रदेशात हिंसाचार झाला, तर त्याला मी जबाबदार असणार नाही, असे मायावती यांनी राज्यसभेत सांगितले.


उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले, मायावती यांनी काशीराम यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. ज्या पद्धतीने त्या पैसे घेऊन उत्तर प्रदेशमध्ये तिकीटे वाटत आहेत, तसे तर एखादी वेश्याही वागली नसती. जर सकाळी कोणी त्यांना तिकीटासाठी १ कोटी रुपयांची ऑफर दिली तर त्या त्याला तिकीट देतात. पण संध्याकाळी कोणी त्याच तिकीटासाठी ३ कोटी देऊ केले तर त्या सकाळच्या व्यक्तीचे तिकीट रद्द करतात आणि संध्याकाळी आलेल्या व्यक्तीला तिकीट देतात. एखादी वेश्याही आपल्या ग्राहकाप्रती यापेक्षा जास्त प्रामाणिक असते, असे विधान सिंह यांनी केले होते.