कार्याचा अहवाल जनतेसमोर सादर करण्याचे योगींचे मंत्र्यांना आदेश
यूपी सरकारला १०० दिवस झाल्यानंतर सर्व मंत्र्यांना आपल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या मंत्रालयाची श्वेत पत्रिका लोकांसमोर मांडण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.
रामराजे शिंदे, झी मिडीया, नवी दिल्ली : यूपी सरकारला १०० दिवस झाल्यानंतर सर्व मंत्र्यांना आपल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या मंत्रालयाची श्वेत पत्रिका लोकांसमोर मांडण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.
सर्व मंत्र्यांनी रोज एक दिवस भाजप कार्यालयात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहीजेत. तर, जिल्ह्यातील तक्रारी सर्वाधिक येतील त्या कलेक्टर आणि पोलिस अधीक्षकांना निलंबित करणार असल्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.
- १०० दिवसांनंतर युपी सरकार जनतेसमोर रिपोर्ट कार्ड सादर करणार
- सर्व मंत्र्यांना आपल्या मंत्रालया व्यतिरिक्त दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर या कामाचे जनतेसमोर रिपोर्ट कार्ड सादर केले जाईल.
- वीज, शेतक-यांच्या समस्या, कायदा सुव्यनस्था, पिण्याचे पाणी आणि शिक्षण अशा जनहिताशी निगडीत समस्यांवर मंत्र्यांना काम करण्याचे आदेश दिले आहेत.
- संघटन आणि सरकार यांच्यातील समन्वयासाठी कोअर ग्रुप बनवला आहे. या कोअर ग्रुपची बैठक होईल.
- भ्रष्टाचाराच्या प्रकरणी झिरो टॉलरन्स असेल. ताबडतोब कारवाई केली जाईल.
- भ्रष्टाचारात अधिकारी सापडले तर थेट जेलमध्ये जावे लागणार.
- रोज एक मंत्री भाजप कार्यालयात जनतेशी संवाद साधणार आणि समस्यांची सोडवणूक करणार
- पोलिस ठाण्यातील प्रभारींनी लोकांशी भेटण्याचे योगींचे आदेश
- मुख्यमंत्री निवासस्थानी ज्या जिल्ह्यातील समस्यांबद्दल तक्रारी येतील, त्या जिल्ह्यांच्या कलेक्टर आणि पोलिस अधिक्षकांना निलंबित केले जाईल.
- मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्यमंत्री मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणी घेणार.
- कोणत्याही जिल्हयात घटना घडली तर अधिकारी मुख्यमंत्री निवासस्थानी माहिती देणार.
- संध्याकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक गावात वीज असायला हवी.
- वीज दिली नाही तर तेथिल अधिकारी जबाबदार असतील.
- सर्व आयुक्त आणि कलेक्टर यांनी जल संवर्धनाचे काम हाती घ्यायचे आहे. जलसहभागिता वाढवण्याचे आदेश.
- प्लास्टिक रोखण्यावर अभियान सुरू करा
- मान्सून पूर्वी नालेसफाई करायला हवी
- जिल्ह्यातील अधिकारी कॅम्प बंद करून सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत लोकांच्या समस्या ऐकण्याचे आदेश.
- रोज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यातील अधिका-यांशी फोनवर चर्चा करून जनतेच्या समस्या जाणून घेणार.