यूपी नवनिर्माण सेनेकडून गोळ्या घालण्याची धमकी
जेएनयूचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि विद्यार्थी संघटनेचे उमर खालिद यांना दुर्गाष्टमी आधी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे.
मेरठ : जेएनयूचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि विद्यार्थी संघटनेचे उमर खालिद यांना दुर्गाष्टमी आधी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे.
इंग्रजी पेपर टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, नवनिर्माण सेनेने कन्हैय्या कुमार आणि उमर खालिदला गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. नवनिर्माण सेनेने म्हटलं आहे की, कन्हैय्या कुमार आणि उमर खालिदने जर ३१ मार्च पर्यंत दिल्ली सोडली नाही, तर त्यांना गोळ्या घालू.
उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष अमित जानीने आपल्य़ा फेसबुक पोस्टवर कन्हैय्या कुमारला आणि उमर खालिदला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अमित जानी कन्हैय्याने दिलेल्या वक्तव्यावरून संतापला आहे.
अमित जानीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, तु मला शिव्या देऊ शकतो, माझ्या परिवाराला शिव्या देऊ शकतो, पण माझ्या धर्मावर टीका करू शकतो, पण भारतीय लष्कराला काहीही बोलू शकत नाही. भारतीय लष्कर भारताची शान आहे.