लखनऊ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊमधील कालिदास मार्ग येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आज गृह प्रवेश करणार आहेत. याविषयी त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही. योगींनी पंधरा मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता बुधवारच्या शुभ मुहूर्तावर ते गृह प्रवेश करणार असल्याचे योगींच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरखनाथ मंदिराचे पुजारी गृहप्रवेशाची पूजा करणार आहेत. या पूजेआधीही मुख्यमंत्री निवासाची पूजा करण्यात आली होती. या वेळी मंत्री, आमदार आणि भाजपचे काही वरीष्ठ नेता उपस्थित असतील. त्यांच्यासोबत योगींनी फळाहाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी योगी दीडशे लोकांसोबत फळाहार करणार आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वेळी महागड्या फर्निचरने सजवलेले हे निवास योगींनी पुर्णपणे बदलले आहे. महागडे सोफे काढून जमिनीवर बैठक होणार आहे. पाहुण्यांची पंगत तांबे आणि पितळेच्या ताटात रंगणार आहे.