नवी दिल्ली : आपल्या वाचाळ बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद आझम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 मार्च रोजी निवडणूक प्रमाणपत्र घेण्यासाठी चिखल असलेल्या रस्त्यावरून यावं लागल्यानं आझम खान चांगलेच भडकले होते. उपजिल्हाधिकारी अभय कुमार गुप्ता यांनी गाडी बाहेरच उभी करण्यास सांगितल्यानं आझम खान यांना चिखलातून चालावं लागलं. यावरून त्यांनी सरकारी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं. 


इतंकच नाही आचार संहिता संपल्यानंतर दोन-तीन दिवसांत अधिकाऱ्यावर अॅक्शन घेण्याचा अधिकारही आपल्याला असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. 


रामपूरमधून नवव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या आझम खान यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिव बहादूर सक्सेना यांना 46 हजार 842 मतांनी पछाडलं.