मुंबई : अकरा अकरा तास बर्फाळ प्रदेशात 'स्टॅन्डींग ड्युटी' करणाऱ्या एका बीएसएफ जवानानं आपली व्यथा सोशळ मीडियातून समोर मांडली... आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाही या व्हिडिओची दखल घ्यावी लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हायरल झालेला व्हिडिओ गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाहिल्यानंतर ताबडतोब त्यानी गृह सचिवांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. 



बीएसएफच्या 29 व्या बटालियनचा जवान तेज बहादूर यादव यांनी हा सर्व प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणलाय. जवानांचा दोन वेळच्या अन्नासाठी वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे छळ करित आहे याचं दाहक वास्तव या जवानानं या व्हिडिओतून समोर मांडलंय. 


या व्हिडीओत भाजी तयार करताना आणि जवानांमधील संवाद आहे. कांदा, लसून काहीच भाजीत नसल्याचे स्वयंपाक करणारा जवान सांगतो. दुसऱ्या व्हिडीओत पराठा दाखवत जवान म्हणतोय की, या पराठ्यासोबत लोणचं, बटर किंवा जाम काहीच दिले जात नाही. फक्त चहा दिला जातो. हा एक पराठा आणि चहा पिऊन जवान या थंडीत कशी ड्युटी करणार? असा सवाल उपस्थित करून त्यानं 'जय हिंद' म्हटलंय. ही अवस्था एका सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची आहे... जे देशांच्या सीमेचे रक्षण करतात... दहशतवाद्यांना भारतात घुसू देत नाही... त्यांची ही अवस्था आहे.



हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ट्विटरवर बीएसएफकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. यामध्ये बीएसएफ आपल्या जवानांच्या कल्याणाप्रती पूर्णत: गंभीर आहे. जर अशा काही तक्रारी असतील तर त्याची नक्कीच चौकशी होईल, असं यात म्हटलं गेलंय.