बंगळुरू : कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाणकाम उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचं लग्न भलतंच चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लग्नासाठी पाहुण्यांसाठी बनवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर चक्क एलईडी स्क्रीन लावण्यात आलाय. यामध्ये रेड्डी कुटुंबीय एका व्हिडिओतून पाहुण्यांना आमंत्रित करताना दिसतायत. 


रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी आणि राजीव यांचा गेल्या महिन्यात धामधुमीत साखरपुडा पार पडला होता. 49 वर्षीय गली जनार्दन रेड्डी यांनी अवैध खाणकाम केल्याप्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगलाय. गेल्या वर्षी त्यांना जामीन मिळालाय. 


जनार्दन आणि त्यांचे भाऊ जी. करुणाकरन रेड्डे येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर जनार्दन यांना सीबीआयनं अटक केली होती.