नवी दिल्ली :  देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता. 


यातील काही अफवांचे लोक बळी पडले... त्या पुढील प्रमाणे 


५० -१०० च्या नोटाही बंद होणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही समाज कंटक नोट बंदीनंतर लोकांमध्ये घबराट निर्माण व्हावी यासाठी सोशल मीडियावर शेअर करत होते की ५० आणि १०० रुपयांची नोटही बंद होणार आहे. या नोटही रातोरात बंद होणार आहे. आम्ही तुम्हांला सांगतो की या अफवेच्या नादाला लागू नका. दुसरीकडे सरकारने स्पष्ट केले होते. की ५० आणि १०० च्या नोटा बंद करण्यात येणार नाही. 


लग्नपत्रिका दाखवून ५ लाख रुपये काढू शकतात...


सोशल मीडियावर एक मेसेज असाही फिरत होता. की ज्या घरात लग्न आहे, त्यांना ५ लाख रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण असे काहीही नाही. सरकारकडून कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. अशा अफवांचे बळी पडू नका. 


वाहतूकदार संपावर जाणार 


या अफवांमध्ये आणखी एक भर पडली ती वाहतूकदारांच्या संपाची... असे मेसेज वेगवेगळे फिरत आहेत. वेगवेगळ्या संघटनांची नावे बदलली जातात. दरम्यान वाहतूकदारांचे सचिव कुलतरण सिंह अटवाल याला अफवा सांगितले आहे.