नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर मोदी सरकारची आज पहिली परीक्षा आहे. आज पाच राज्यांतील 12 लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकींसाठी मतदान होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीचा निर्णय़ लागू केल्यानंतर 11 दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील बँकांसमोरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. अशातच या पोटनिवडणुकींसाठी आज मतदान होत आहे. मतदान सकाळी सात वाजता सुरु झाले असून संध्याकाळी पाच वातेपर्यंत सुरु राहणार आहे.


मध्यप्रदेशातील शहडोल आणि नेपानगर या दोन विधानसभेच्या जागेसाठी, आसाममधील लखीमपूर लोकसभा जागेसाठी तसेच बैठलांगसो या विधानसभेच्या जागेसाठी मतदान होतंय. 


पाँडिचेरीमधील नल्लीथोप्पे या विधानसभेच्या जागेसाठी तर पश्चिम बंगालमधील कूच बिहार आणि तमलुक या दोन लोकसभेच्या जागांसाठी तर मोंटेश्वर या एका विधानसभेच्या जागेसाठी मतदान होतंय. तामिळनाडूमधील तंजावर, अरावक्कूरीच्ची आणि तिरुपरानकुंदरम या विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान पार पडतंय.