नोटा परत करायला जाताना कोणती कागदपत्र न्याल?
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. यानंतर आता आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्टामध्ये जाऊन पाचशे आणि हजाराच्या नोटा द्याव्या लागणार आहेत.
या नोटा देताना तुम्हाला तुमच्याकडे असलेली वैध कागदपत्र घेऊन बँकेत किंवा पोस्टात जावं लागणार आहे. यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड, सरकारच्या कोणत्याही विभागानं दिलेलं आयडी कार्ड तसंच सरकारी कर्मचाऱ्यांकडे असलेलं त्यांचं आयडी यापैकी कोणतंही एक वैध कागदपत्र बँकेत आणि पोस्टात दाखवावं लागणार आहे.
याबरोबरच तुम्हाला पैसे भरताना किंवा काढताना काही समस्या आल्या तर तुम्ही कधीही आरबीआयच्या publicquery@rbi.org.in या ईमेल वर तुमची समस्या पाठवू शकता, किंवा 022 22602201/022 22602944 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.