पंतप्रधानांच्या बॉडीगार्डच्या हातातल्या `त्या` बँगमध्ये काय असतं?
पंतप्रधान जेव्हाही कोठे बाहेर असता तेव्हा त्यांच्यासोबत नेहमी त्याचा सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात असतात.
मुंबई : पंतप्रधान जेव्हाही कोठे बाहेर असता तेव्हा त्यांच्यासोबत नेहमी त्याचा सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी या विशेष सुरक्षा विभागाकडे असते. एसपीजीकडे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील असते. एसपीजीच्या जवानांकडे FNF-2000 असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि १७-एम असे आधुनिक हत्यारे असतात. पण त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षारक्षकाकडे एक बँग देखील असते. त्यामध्ये काय असते याची माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
पंतप्रधान कोणत्याही दौऱ्यासाठी जाताना त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकाकडे एक ब्रीफकेस किंवा सूटकेस असते. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तुम्ही हे पाहिलं असेल.
पंतप्रधानांच्यासोबत असलेल्या सूटकेसमध्ये काय असतं ?
पंतप्रधानासोबत असलेली ही सूटकेस एक न्यूक्लियर बटण असतं. ही सूटकेस खूपच पातळ असते. ही एक पोर्टेबल बुलेट प्रूफ शील्ड किंवा पोर्टेबल फोल्ड आऊट बॅलिस्टीक शील्ड असते. एखाद्या आरपातकालीन परिस्थितीत ती उघडली जाऊ शकते. या सूटकेसला एनआयजी लेवल -३ ची सुरक्षा दिली आहे. जेव्हा पण सुरक्षारक्षकांना पंतप्रधानांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत मिळत असेल तर त्या सूटकेसला झटका देताच ती बॅग ओपन होते. एक प्रकारची ढाल म्हणून त्याचा वापर होतो.
सूटकेसमध्ये एक गुप्त खिसा देखील असतो ज्यामध्ये बंदूक ठेवलेली असते. एसपीजीसोबत असलेल्या एक काऊंटर अटॅक टीम CAT म्हणजे Counter Assault Team देखील असते. या टीमकडे ‘एफ एन- २०००’ पी-९०, ग्लोक – १७, आणि एफ एन-५ सारखी हत्यारं असतात. या टीमला विशेष प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलेलं असतं. पंतप्रधानांवर कधीही, कुठेही हल्ला झाला तरीही ते कारवाई करू शकतात. एसपीजी देशातील खास व्यक्तिंसोबतच राजकीय यात्रांना तसेच जगभरातील नेत्यांना आणि आंतरराष्ट्रीय लोकांना देखील सुरक्षा प्रदान करतात.