अचानक घरी पोहोचलेल्या सैनिकाने तेव्हा पत्नीला पाहिलं आपत्तीजनक स्थितीत
गुजरातमधील भावनगरमध्ये पती-पत्नी एका फ्लॅटमध्ये राहत होते. एक दिवशी सरंक्षण दलात असणारा पती कामावरुन घरी आला आणि पाहिलं की घराचं दार आतून बंद आहे. त्याने बराच वेळ दार ठोकलं पण दार आतून उघडलं नाही. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्य़ा किल्लीने दार उघडलं.
अहमदाबाद : गुजरातमधील भावनगरमध्ये पती-पत्नी एका फ्लॅटमध्ये राहत होते. एक दिवशी सरंक्षण दलात असणारा पती कामावरुन घरी आला आणि पाहिलं की घराचं दार आतून बंद आहे. त्याने बराच वेळ दार ठोकलं पण दार आतून उघडलं नाही. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्य़ा किल्लीने दार उघडलं.
दार उघडून तो जसं त्याच्या बेडरूमजवळ पोहोचला त्याच्या पायाखलची जमीनच सरकली. त्याने त्याच्या पत्नीला तिच्या प्रेमीसोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिलं. हे पाहून तो त्याच्या रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकला आणि त्याने त्याच्या जवळ असलेल्या बंदुकीने पत्नीवर गोळी झाडली त्यानंतर प्रेमी हा बाथरुममध्ये जाऊन लपला पण त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत पत्नी पोलीस स्थानकात पोहोचली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पोलीस पोहोचेपर्यंत प्रेमीचा मृत्यू झाला होता.
पतीने स्वत:ला पोलिसांच्या हवाले केलं. ही घटना १३ जानेवारी २०१५ ची आहे पण जवळपास दीड वर्षानंतर यावर कोर्टाचा निकाल आला. कोर्टाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नीचा प्रेमी आणि पती हे दोघं मित्र होते. पण मित्रानेच त्याचा विश्वासघात केल्याचं समोर आलं. या सैनिकाने अनेकदा दहशदवाद्यांसोबत चकमकीमध्ये ७ दहशदवाद्यांचा खात्मा केला. मुंबईमधील २६/११ हल्ल्याच्या वेळी देखील हा सैनिक एनएसजी टीममध्ये होता असं म्हटलं जातंय. या सैनिकाला राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देखील मिळाल्याची माहिती समोर येतेय.