लखनऊ : उत्तर प्रदेशचे नवे मंत्री उपेंद्र तिवारी अचानक चर्चेत आले आहेत. तिवारी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विधानसभेतील त्यांच्या कार्यालया बाहेर झाडू मारतांना त्यांचा हा व्हि़डिओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी जेव्हा त्यांच्या विधानसभा कार्यालयात पोहोचले तेव्हा तेथे कचरा पसरला होता. ते पाहताच त्यांनी झाड़ू उतलला आणि साफसफाई करु लागले. यानंतर तेथे उपस्थित अधिकारी देखील अचंबीत झाले. 


यूपीचे ४४ वर्षाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत शपथ घेतली की ते आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतील. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना साफ-सफाईसाठी वर्षभरात १०० तास देण्यास सांगितले आहे.


याआधी मुख्यमंत्री आदित्यनाथ काल स्वत: सचिवालयाचं निरीक्षण करण्यासाठी निघाले. यादरम्यान त्यांना पायऱ्यांवर आणि भीतींवर गुटखा खाऊन थंकलेलं दिसलं. त्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये गुटखा खाण्यास अधिकाऱ्यांना त्यांनी बंदी घातली.


पाहा व्हिडिओ