मुंबई : सध्या एका मंत्र्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मोदी सरकारमध्ये नंबर १ मंत्री म्हणून कलराज मिश्रा यांची मोठी चर्चा आहे. कलराज मिश्रा सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० जूनला मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना सोशल मीडियावर सक्रिय होण्यासाठी सांगितलं. बैठकीनंतर जेव्हा मंत्री निघाले तेव्हा प्रत्येकाच्या हातात एक बंद पाकीट दिलं गेलं. ज्यामध्ये प्रत्येक मंत्रीचे फेसबूक फ्रेंड्स, पेज लाइक्स, ट्विट्सची माहिती दिली गेली होती.



मोदी सरकारमधील मंत्र्यांना नमो अॅप आणि हॅशटॅग ट्रान्सफार्म इंडियाला जास्तीत जास्त रिट्विट करण्यासाठी सांगितलं आहे. मंत्रीपरिषदेत ४ जूनला बदल होणार होते ज्यामध्ये ७५ वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात येणार होती. कलराज मिश्रा १ जुलैला ७५ वर्षांचे झाले. नजमा हेपतुल्लाह यांना देखील त्यांच्या वयामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण कलराज मिश्राने खुर्ची टिकून राहावी म्हणून मोठ्या प्रमाणात ट्विट आणि रिट्विट करत आहेत. कारण पीएम मोदींच्या नजरेत त्यांची सोशल मीडियावर असलेली सक्रियता दिसावी म्हणून तर हा प्रयत्न नाही हा अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.