नवी दिल्ली : आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात तेल उत्पादन करण्याऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांमधील इंडियन ऑईल कॉरपोरेशन (आईओसी) चे अध्यक्ष बी.अशोक यांनी सांगितले की, २०१५-१६ मध्ये कंपनीचा १०,३९९ करोड रुपयांचा फायदा झाला. जो अत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त नफा आहे. जो मागील वर्षी केवळ ५,२७३ रूपयांचा नफा झालेला. या नफ्याचे कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाले असल्याचे सांगितले.

सरकारी तेल कंपनी हिन्दुस्तान पेट्रोलिअम कॉरपोरेशन लिमिटेडचे (एचपीसीएल) अध्यक्ष एम. के. सुराना यांनी सांगितले, गेल्या वर्षी एचपीसीएलचा नफा ३,८६३ कोटी रूपयांचा होता. तर त्यामागील वर्षीय नफा ४१ टक्क्यांनी जास्त होता.

 दरवाढीसाठी ही ३ कारणे

१. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीनुसार ठरविल्या जातात.
२. कच्च्या तेलाचा वाहतूक खर्च हा पहिल्या खर्चा एवढाच आहे.
३. केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.