नवी दिल्ली  : जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. आता याचं पक्षाच्या खासदाराने केंद्रातील भाजप सरकारला प्रश्न विचारला आहे, बुऱ्हान वणी याला ठार मारण्याची गरजच काय होती. बुऱ्हान वणी हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन लोकसभेत विरोधक सरकारला घेरलंय, मात्र जम्मू-काश्मीरमधील भाजपचा मित्र पीडीपीनेही  त्यांना प्रश्न केला आहे. 


बुऱ्हान वणीला ठार मारण्याची काय गरज होती? वणी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी केला आहे.


वणीला मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत येथे चाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. वणीला मारल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले, असंकाँग्रेस आणि तृणमूलने म्हटलंय.