मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एयर इंडिया वन या विमानाला फ्लाइंग पीएमओ मध्ये रुपांतरीत केलं गेलं आहे. पंतप्रधान मोदी लांबच्या प्रवासात विमानातच बैठक किंवा इतर कामं करतात. पण पंतप्रधानांच्या विमानात एक गोष्ट नाही केली जात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी विमानात कोणत्याही व्यक्तीला दारू नाही सर्व्ह करायची असं निश्चित केलं आहे.


व्हीव्हीआयपीसाठी वापर केल्या जाणाऱ्या एयर इंडियांच्या बोईंग ७४७ या विमानाचा वापर २५ वर्ष केला जातो. परदेश दौऱ्यात जेवणाचा मेन्यू हा विदेश मंत्रालय ठरवतं. पंतप्रधान मोदी स्वत:साठी फक्त शाकाहारी जेवण निवडतात. पण मासांहारी जेवणावर विमानात कोणतीही बंदी नाही. इतर लोकं ते खावू शकता.