नवी दिल्ली : आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI ने म्हटलं होतं की, 3 आठवड्यानंतर 13 मार्चला होळीच्या दिवशी बचत खात्याची नोटबंदीनंतर लावली गेलेली मर्यादा हटवण्यात येणार आहे. चालू खाते, ओवरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट खात्यांवरची मर्यादा 30 जानेवारीलाच संपवण्यात आली होती. सोबतच एक फेब्रुवारीपासून ATMमधून पैसे काढण्याची मर्यादा देखील हटवण्यात आली होती. बचत खात्यावर 24 हजार रुपयांची आठवड्याला मर्यादा होती. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा होती.


नोटबंदीनंतर RBI ने या मर्यादा घातल्या होत्या. जसे-जसे नवे चलन बाजारात येऊ लागले त्यानंतर आरबीआयने हळू-हळू या मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला. 13 मार्चनंतर संपूर्ण मर्यादा हचवण्यात येणार आहे.