लखनऊ : उत्तर प्रदेशात एक धक्कादाय बाब पुढे आलेय. ही बातमी वाचून शरमेने मान खाली जाते. एका महिलेने पतीवर केलेला आरोप पाहून तुम्ही हैराण व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववधुने मला फसवून लग्न करण्यात आले आणि नवऱ्याच्या मित्रांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केलाय. त्यानंतर या नववधुने याबाबत पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोप करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींनी ही गोष्ट खोटी असल्याचा दावा केलाय.


पीडित महिलेने सांगितले, राजमल गौतम नावाचा तरुण माझ्या शेजारी राहत आहे. एक दिवस काही कारणावरून माझ्या वडिलांनी त्याच्या कानाखाली मारली. याचा बदला घेण्यासाठी राजमहलने प्रेमाचे नाटक केले आणि लग्न केले. लग्नानंतर दोघेही लपून लखनऊमध्ये राहू लागले.


काही दिवसानंतर राजमल आपल्या मित्रांसोबत घरी आला. त्याने त्याच्या मित्रांसोबत फिजिकल रिलेशन ठेवण्यास सांगितले. त्यावेळी मी विरोध केला. त्यावेळी त्यांने धमकी दिली की, कुटुंबीयांना ठार मारीन. कुटुंबाच्या काळजीमुळे मी सर्व सहन करत राहिले. मात्र, मला हे सहन होत नाही. मी आतून पार कोलमडून गेलेय. यातून मला बाहेर पडायचेय, असे पीडित महिलेने सांगितले.