काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना आता महिला बटालियन शिकवणार धडा
काश्मीर खोऱ्यातल्या या दगडफेकीच्या समस्येवर उपाय म्हणून आता 1 हजार महिलांची बटालियन उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पाच भारतीय राखीव बटालियन तयार करण्याची घोषणा सरकारनं यापूर्वीच केली आहे. त्यामध्ये आता १ बटालियन ही केवळ महिला पोलिसांची असेल.
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातल्या या दगडफेकीच्या समस्येवर उपाय म्हणून आता 1 हजार महिलांची बटालियन उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पाच भारतीय राखीव बटालियन तयार करण्याची घोषणा सरकारनं यापूर्वीच केली आहे. त्यामध्ये आता १ बटालियन ही केवळ महिला पोलिसांची असेल.
५ हजार जागांसाठी जम्मू आणि काश्मीरमधून 1 लाख 40 हजार अर्ज असून यातले 40 टक्के तरूण काश्मीर खोऱ्यातले आहेत. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. ही महिलांची बटालियन प्रामुख्यानं दगडफेकीच्या घटना हाताळणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.