नवी दिल्ली : द ग्रेट खलीच्या एका विद्यार्थींनीला चक्क एका पंजाबी ड्रेसमधील महिलेने आखाड्यात लोळवले हे वृत्त तुम्ही पाहिले, पण ती कोणी सामान्य महिला नसून एक कुस्तीपटूच आहे. या महिलेचे नाव आहे कविता. कविता ही हरियाणाची निवासी असून तिने हरियाणा पोलीस खात्यात काम केले आहे. सध्या ती सीमादलात काम करतेय.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे कविता

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. एका कुस्तीपटूने दिलेले आव्हान कसे सामान्य महिलेने स्वीकारून तिला भर आखाड्यात अस्मानं दाखविले. साध्या सलवार कमीजमध्ये असणारी ही महिला आहे तरी कोण याचे कुतूहल लोकांना होते.

३० वर्षीय कविताने तिच्या भावाच्या सल्ल्यानुसार वेट लिफ्टिंगचा सराव २०व्या वर्षीच सुरू केला होता. अनेक खेळांमधली ती एक सिनीअर नॅशनल चॅम्पियन आहे. द ग्रेट खलीच्या अकादमीध्ये कविताला येऊन फक्त ३ आठवडेच झाले आहेत. तिच्या परफॉरमन्सवर प्रभावित होऊन खलीने तिला हार्ड केडी हे नाव दिले आहे.

भल्याभल्यांना अस्मानं दाखवू शकणाऱ्या या महिलेने एका बास्केटबॉल चॅम्पियनशी लग्न केले आहे.