अहमदाबाद : गुजरातमधील उत्तरसंडा हे देश आणि जगात आपल्या पापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मठिया आणि चोराफली हे दोन आणखी तेथील प्रसिद्ध गोष्टी. दिवाळीच्या दिवसात यांना खूप मागणी असते. त्यामुळेच येथील महिला जवळपास दिवाळीमध्ये ७० कोटींचा व्यवसाय करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 हजार लोकसंख्या असलेल्या उत्तरसंडा गावात दिवाळीत एक वेगळंच वातावरण असतं. उत्तरसंडामध्ये बनलेली चोलाफली, मठिया आणि पापड परदेशात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. छोट्या गावात हा गृहउद्योग करणारी ३५ हून अधिक कंपन्या आहेत. ज्या दिवाळीत ७० कोटींचा व्यवसाय करतात.  


उत्तरसंडा मध्ये हे मार्केट ३० वर्षापूर्वी सुरु झालं होतं. दिवाळीत या कंपन्या दिवसात ३ ते ६ टन मालाचं उत्पादन करतात. दिवाळीत एका महिन्यात येथील महिला जवळपास ७०० टन मालाचं उत्पादन करतात. ज्याचं अंदाजे उत्पन्न हे ७० कोटींच्या घरात आहे. 


दोन महिन्याआधीच या महिलांना ऑर्डर मिळते. 15 टक्के उत्पादन गुजरातच्या बाहेरील राज्यांमध्ये जातं. हे उत्पादन तीन महिन्यापर्यंत ताजं राहतं.