1 हजार कोटींची हेराफेरी, बँक मॅनेजरला अटक
ऑनलाईन गंडा घालणाऱ्या अनुभव मित्तलसोबत जवळपास एक हजार कोटींची हेराफेरी करणाऱ्या यस बँकेचा मॅनेजर अतुल मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे. एसटीएफच्या राजकुमार मिश्रांनी सांगितलं की, या गोष्टीची शंका होती की, अनुभव मित्तलने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत मिळून बँकेच्या खात्यातील रक्कम काढली आहे. तपासात समोर आलं की, गाजियाबादमधील राजनगरमधील यस बँकेत अनुभव मित्तलच्या एब्लेज इंफो साल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडचे दोन खाती आहेत. या खात्यातून ऑक्टोबर-डिसेंबर 2016 मध्ये एक कोटी वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रांसफर केले गेले.
नवी दिल्ली : ऑनलाईन गंडा घालणाऱ्या अनुभव मित्तलसोबत जवळपास एक हजार कोटींची हेराफेरी करणाऱ्या यस बँकेचा मॅनेजर अतुल मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे. एसटीएफच्या राजकुमार मिश्रांनी सांगितलं की, या गोष्टीची शंका होती की, अनुभव मित्तलने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत मिळून बँकेच्या खात्यातील रक्कम काढली आहे. तपासात समोर आलं की, गाजियाबादमधील राजनगरमधील यस बँकेत अनुभव मित्तलच्या एब्लेज इंफो साल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडचे दोन खाती आहेत. या खात्यातून ऑक्टोबर-डिसेंबर 2016 मध्ये एक कोटी वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रांसफर केले गेले.
एसटीएफने याची चौकशी सुरु केली आहे. ज्यामध्ये माहिती समोर आली आहे की, मित्तलच्या एब्लेज इंफो कंपनीच्या खात्यातून पैसे ट्रांसफर होण्याच्या प्रक्रियेला बँकेने गांभिर्याने घेतलं होतं. बँकेने चौकशीसाठी एक कमेटी बनवली आहे. सोबतच कंपनीच्या खात्यातून रक्कम ट्रांसफर बंद केली आहे. याच दरम्यान यस बँकेचे बिजनेस रिलेशन मॅनेजर अतुलने अनुभवसोबत हातमिळवणी केली.
बँकने खात्यावर बंदी घातली असतांना देखील खात्यातून एक हजार कोटी ट्रांसफर झाले. ज्या खात्यांमध्ये पैसे गेले त्यांची चौकशी होत आहे. या कामासाठी बँकेच्या अधिकाऱ्याला 7 लाख रुपये दिले जाणार होते. पण नोटबंदीमुळे पैशाचा बंदोबस्त नाही झाला. अतूलला भ्रष्टाचाराची रक्कम खात्यातून नको होती. त्यामुळे नोटबंदी उठताच पैशांचा बंदोबस्त करण्याची तयारी होती पण त्याआधीच हा खेळ संपला आणि ते पोलिसांच्या हाती लागले.