उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी योगी नव्हते मोदी-संघाची पसंती
योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ विराजमान झाले.
नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ विराजमान झाले. पण योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसची पहिली पसंती नव्हते अशी माहिती मिळतेय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विश्वासामुळे योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं. योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढे यायच्या आधी मनोज सिन्हा यांच्या नावाची चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पसंती मनोज सिन्हाच होते.
एवढच नाही तर मुख्यमंत्री निवडीच्या दिवशी मनोज सिन्हांनी काशी विश्वनाथ आणि काल भैरव या दोन प्रमुख मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. यामुळे मनोज सिन्हांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं. पण अमित शहांनी सिन्हांच्या नावावर प्रश्न उपस्थित केले.
पक्षातूनच सिन्हांच्या नावाला विरोध असल्याचं सांगण्यात आलं. यामुळे केंद्रात गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांच्या नावाचीही चर्चा झाली. यानंतर सिन्हा आणि राजनाथ सिंग यांच्याऐवजी शहांनी योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढे केलं आणि यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं.