लखनऊ : पुढच्या 40 दिवसांत उत्तरप्रदेशला चकचकीत आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत. तसा एक उपक्रमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 40 दिवसांत उत्तरप्रदेशमधील जवळपास 11,107 रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 1400 करोड रुपयांची कामं होणार आहेत. 


15 जूनपूर्वी म्हणजेच पावसापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचे आदेशच योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रशासनाला दिलेत. 


ही कामं नियोजितरित्या सुरू आहेत किंवा नाहीत यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर मंत्री देखरेख ठेवणार आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री या ठिकाणी सरप्राईज भेट देणार असल्याचंही सांगण्यात येतंय.