अहमदाबाद : यूपीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज अजय सिंह बिस्त उर्फ योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहेत.. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात येणार आहेत. लखनौच्या लोकभवनात भाजपच्या 324 आमदारांची बैठक झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत हा निर्णय झाला.  काल सकाळपासून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचं नाव आघाडीवर होतं. पण दुपारनंतर अचानक सूत्र फिरली आणि योगी आदित्यनाथाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. 


याच बैठकीत लखनौचें महापौर दिनशे शर्मा आणि उत्तरप्रदेश भाजपचे केशवप्रसाद मौर्य हे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत.


संध्याकाळी आठच्या सुमारास नायडू, उत्तरप्रदेशचे प्रभारी ओम माथूर यांच्यासह योगी आदित्यनाथ, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर सुशासन आणि सबका साथ सबका विकासचा मंत्र घेऊन उत्तरप्रदेशातलं सरकार काम करेल असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. आज दुपारी सव्वा दोन वाजता योगी आदित्यनाथांचा शपथविधी सोहळा होणार आहे.