नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनल्यानंतर योगी सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग ही ४ एप्रिलला ५ वाजता होणार आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी याची माहिती दिली आहे या कॅबिनेट बैठकीत यूपीमधील शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो. भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.


यूपीमध्ये वीजेची चोरी थांबवण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. तर कायदा सुव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आणखी काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.