नवी दिल्ली :  तुमच्याकडे अजूनही जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा आहेत आणि तुम्ही विचार करत आहात की त्या रिझर्व बँकेत जाऊन बदलू शकाल. तर तुम्हांला दणका देणारी ही बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व बँकेने जुन्या नोटा बदलण्याची सुविधा बंद केली आहे. देशातील सामान्य जनता आता आरबीआयमध्ये जाऊन जुन्या नोटा बदलू शकणार नाही. केवळ एनआरआय किंवा देशातून बाहेर राहणाऱ्या काही लोकांना काही अटींवरच जुन्या नोटा जमा करता येणार आहेत. 


८ नोव्हेंबरला नोटबंदी झाल्यावर सरकारने ४५०० रुपयांपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची सुविध होती. त्यानंतर ती हळूहळू बंद करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होता. 


त्यानंतर सरकारने खात्यामध्ये जुन्या नोटा भरण्याची मुभा देण्यात आली. ती ३० डिसेंबरपर्यंत होती. ५२ दिवसात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमा झाल्या. त्यानंतर  ३१ मार्च पर्यंत तुम्ही तुमच्याकडील ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटात आरबीआयमध्ये ३१ मार्चपर्यंत जमा करू शकणार आहात. पण त्यासाठी योग्य कारण आवश्यक आहे. 


यापूर्वी आरबीआयने शनिवारी जाहीर होते की भारतीय नागरी जो ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत परदेशात होते. ते ३१ मार्च २०१७ पय४यंत नोटा बदलू शकतात. तसेच जे एनआरआय आहेत याकालावधीत परदेशात होते. ते चलनातून बाहेर गेलेल्या नोटा ३० जून २०१७ पर्यंत बदलू शकतात. अप्रवासी भारतीयांना फेमा कायद्यांतर्गत नोटा बदलण्याची सूट देण्यात येणार आहे. तसेच एनआरआयला आपले ओळखपत्र दाखवून बदलता येणार आहे. तसेच त्याला सिद्ध करावे लागले तो वरील कालावधीत देशाबाहेर होता. 


आरबीआयने ही सुविधा केवळ मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता आणि नागपूरच्या आरबीआय बँकेत दिली आहे. तसेच भारतीय नागरिक नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि बांग्लादेशात राहतात त्यांना ही सुविधा मिळणार नाही.