नवी दिल्ली : वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक यांनी आरोपांवर अखेर मौन सोडलं आहे. झाकीर नाईक यांनी एक वक्तव्य जारी केल्याचं सांगण्यात येतं. यात नाईक यांनी म्हटलंय, मी दहशतवादासोबत नाही, मला कोणत्याही चौकशी एजन्सीने संपर्क केलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाईक भारतात कधी परतणार, यावर झाकीर नाईक यांनी वक्तव्य जारी करून म्हटलं आहे,  'मला माझ्यावर जी मीडिया ट्रायल सुरू आहे, त्याविषयी आश्चर्य वाटतंय'. 


मला भारताच्या कोणत्याही एजन्सीने संपर्क करून स्पष्टीकऱण मागितलेलं नाही, जर सरकारच्या कोणत्याही एजन्सीला माझ्याकडून माहिती घ्यायची असेल, तर मी प्रतिसाद देण्यास तयार आहे, मी दहशतवाद आणि हिंसेच्या कोणत्याही स्वरूपाचं समर्थन करत नाही.


मुंबई पोलिसांची टीम आणि केंद्रीय चौकशी समिती जाकी यांची भाषण एकत्र करण्याचं कम करत असल्याचं सांगितलं जातंय. झाकीर नाईक यांनी आतापर्यंत परतायला हवं होतं, पण ते का परतले नाहीत याविषयी त्यांच्या संस्थेने देखील काहीही उत्तर दिलेलं नाही. झाकीर नाईक यांच्यावर चिथावणी देणारे भाषण करण्याचा आरोप आहे.