मुंबई : मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. झाकीर नाईकच्या आयआरएफ या संस्थेवर याआधीच पाच वर्षांची बंदी केंद्र सरकारने घातली आहे. त्यात आता झाकीर नाईकची वेबसाईटही बॅन करण्यात आली आहे. गुगलवर सर्च केलं असता ही वेबसाईट ओपन होत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच एनआयएकडून झाकीर नाईकच्या एनजीओवर सलग तिसऱ्या दिवशी धाडसत्र सुरू आहे. एनआयए झाकिर नाईकला समन्स बजावण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. झाकीर नाईककडून प्रेरणा घेऊन ढाक्यामध्ये हल्ला केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला होता. यानंतर झाकीर नाईकवर कारवाईला सुरुवात झाली. ढाका दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईक अजून भारतात परत आलेला नाही.