बगदाद : इराकची राजधानी बगदाद शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बगदादमधील नखील मॉलजवळ दोन कारमध्ये स्फोट झाले. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच 28हून अधिक जखमी झालेत. 


पुढील आठवड्यात ईद असल्याने मॉल परिसरात लोकांची मोठी गर्दी होती. या ठिकाणी दोन कारमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसिसने घेतलीये. 


याआधी जुलैमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 300हून अधिक नागरिक ठार झाले होते. हा इराकच्या राजधानीत झालेला सर्वात मोठा हल्ला होता.