डोनाल्ड ट्रम्प विरोध : निदर्शकांवर अश्रुधुराचा मारा, 217 जणांना अटक
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी वॉशिंग्टनमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा केला.
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी वॉशिंग्टनमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करताना काहींनी हिंसक निदर्शने केली. यावेळी थोडा हिंसाचार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी 217 जणांना अटक केली आहे.
अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तर वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली . लाखोंच्या साक्षीने व्हाईट हाऊस जवळील कॅपिटल हिलवर हा दिमाखदार सोहळा पार पडला. तब्बल तेराशे कोटींपेक्षा जास्त खर्चाचा हा शपथविधी, आतापर्यंतचा सर्वात महागडा शपथविधी ठरला.
मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्याकडे सूत्रं सोपवली. या सोहळ्याने अमेरिकेत ओबामा पर्व संपून ट्रम्पराज सुरु झालंय. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला. निवडणुकीदरम्यान दिलेला अमेरिकेला पुन्हा महान बनवूया हा संकल्प त्यांनी अध्यक्षीय भाषणानंतर पुन्हा बुलंद केला.
सगळ्यात आधी अमेरिका आणि अमेरिकन नागरिक यांचे हित पाहणं हेच धोरण असेल, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. आपल्या छोटेखानी भाषणात ट्रम्प यांनी दहशतवादासह विविध समस्यांवर भूमिका स्पष्ट केलीय.
जगातून दहशतवाद मिटवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केलाय. ट्रम्प यांच्या या शपथविधी सोहळ्याला हिलरी क्लिंटन, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, लॉरा बुश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.