सीरिया : सीरियातल्या ऍलेप्पो भागामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे तीस जणांचा बळी गेलाय. मृतांमध्ये तीन मुलांसह शहरातल्या अखेरच्या बालरोगतज्ज्ञाचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडखोरांना लक्ष्य करताना सीरिया सरकारच्या हवाई दलानं, इथल्या रुग्णालयावरच हा हवाई हल्ला केला. 


सीरियामधल्या रुग्णालयावरच्या हल्ल्याचा अमेरिकेनं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सीमारेषा विसरुन रुग्णांवर उपचार करणाऱ्या मानवतावादी डॉक्टरांवरचा हा भ्याड हल्ला भ्याड असल्याची टीका, अमेरिकेनं केली आहे. 


सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी असे हल्ले थांबवावेत याकरता रशियानं दबाव आणण्याचं आवाहन यावेळी अमेरिकेने केले.