आश्चर्य ! ४ वर्षांच्या मुलाला जन्मठेप
4 जणांची हत्या, ८ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप असणाऱ्या एका मुलाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
कैरो : 4 जणांची हत्या, ८ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप असणाऱ्या एका मुलाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
खुनाच्या आरोपाखाली आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा मिळाल्याचे तुम्ही आजपर्यंत अनेकवेळा ऐकले असेल. पण एका ४ वर्षांच्या मुलाला जन्मठेप सुनावली हे जरा आश्चर्य वाटण्या सारखंच आहे. पण हे सत्य आहे.
इजिप्तमधील एका न्यायालयाने ४ वर्षांच्या मुलाला चौघांची हत्या केल्याच्या आरोपाखाली जन्मठेप सुनावली आहे. अहमद मन्सूर कर्मी असं या चिमुरड्याचं नाव आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गुन्हे करतांना त्याचं वय केवळ एक वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. २०१४ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांप्रकरणी पश्चिम कैरोमध्ये ११५ आरोपींना सामुहिकरित्या जन्मठेपेची सुनावणी करण्यात आली. त्यापैकी अहमद हा एक आहे.