काबुलच्या आत्मघातकी हल्ल्यात 80 ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये 80 जण ठार झाले आहेत
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये 80 जण ठार झाले आहेत, तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. काबुलच्या देह मझांग चौकामध्ये हजारा समाजाकडून आंदोलन सुरु होतं. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाच्या या ठिकाणी आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
आंदोलनाच्या ठिकाणी तीन आत्मघातकी आले, यातल्या एकानं स्वत:ला बॉम्बनं उडवून दिलं, तर दुसरा पोलिसांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.