वॉशिंग्टन : हैती देशाला मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसलाय.  यातल्या बळींची संख्या आता 842 च्या वर गेलीय. हजारो लोक या वादळामुळे बेघर झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लोरिडामधल्या लाखो लोकांना स्थलांतरीत करण्यात आलंय. अमेरिकेतल्या सर्वात गरीब राष्ट्र हैतीमध्ये या वादळांनं मोठं नुकसान केलंय.  


खबरदारीसाठी अमेरिकेतील फ्लोरिडाच नाही तर जॉर्जिया, साऊथ कॅरोलिनामधल्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.