जलालाबाद : अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला आपला निशाणा बनवलंय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूतावासातील एका अफगान सुरक्षारक्षकासहीत नऊ जण ठार झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय दूतावासाच्या इमारतीचंही या हल्ल्यामुळे नुकसान झालंय. नवी दिल्लीत परदेश मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे सगळे म्हणजे सहा दहशतवादी मारले गेलेत तर सगळे भारतीय सुरक्षित आहेत. 


अफगान राष्ट्रीय पोलिसांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर घाबरलेल्या एका दहशतवाद्यानं स्वत:ला इमारतीसमोरच उडवून दिलं... तर दुसऱ्यानंही दहशतवादी ज्या कारमधून इथं घुसले होते त्या कारसहीत स्वत:चा स्फोट घडवून आणला. 


याआधाही तीन जानेवारी रोजी हत्यारांसहीत आलेल्या दहशतवाद्यांनी मजार-ए-शरीफ स्थित भारतीय मिशनवर हल्ला केला होता. जवळतास २५ तास सुरू असलेल्या या गोळीबारात सगळ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं.