नवी दिल्ली : अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तानला इशाराच देऊन टाकला आहे. जर भारतात जाण्यासाठी अफगानिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा बॉर्डरवरुन जाऊ नाही दिलं तर पाकिस्तानच्या व्य़ापाऱ्यांना मध्य आशियामधील देशांमध्ये जाण्यासाठी उपयोगात येणारा ट्रांजिट रूट देखील बंद केला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्षांनी ब्रिटेनचे विशेष दूत ऑवन जेनकिन्स यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान जर अफगानच्या व्यापाऱ्यांना वाघा बॉर्डरवरुन जाण्यास मनाई करत असेल तर अफगानिस्तान देखील मोठं पाऊल उचलेल.


अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तोरखम बॉर्डरवरुन सध्या तणावाचं वातावरण आहे. आता ही दोन्ही देशांमध्ये संबंध वादाचे आहेत. भारतासोबत अफगानिस्तानचे सुधारत चाललेले संबंध आणि आता अफगानिस्तानने पाकिस्तानला रस्त्याच्या वादावरुन खडसावल्यानंतर पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.