हवाई हल्ल्यात अल् कायदाचा प्रमुख नेता ठार
अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या कारवाईत अल् कायदाचा प्रमुख नेता ठार झाल्याची माहिती आज पेंटागॉनकडून देण्यात आली.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या कारवाईत अल् कायदाचा प्रमुख नेता ठार झाल्याची माहिती आज पेंटागॉनकडून देण्यात आली.
गेल्या महिन्यात ईशान्य अफगाणिस्तानमध्ये कारवाई करण्यात आली. यावेळी हवाई हल्ल्यांमध्ये अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता फारुक अल काहतनी ठार झाला.
अमेरिकेच्या सैन्याने गेल्या महिन्यात ईशान्य अफगाणिस्तानमधील कुनार भागात केलेल्या हवाई हल्ल्यात काहतनी ठार झाला, असे पेंटागॉनचे प्रवक्ते पीटर कुक यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा दहशतवादी जाळे पसरविण्याच्या प्रयत्नाला हादरा बसलाय.
अमेरिकेच्या सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यावर भर दिलाय. अमेरिका काहतनीचा गेल्या चार वर्षांपासून शोध घेत होती. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल् कायदाची सूत्रे जवळपास त्याच्या हाती होती.