आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीबाबाचे जॅक मा
अलीबाबा डॉट कॉम ही साईट चीनची असली तरी संपूर्ण आशियात या साईटचा दबदबा वाढत चालला आहे.
मुंबई : अलीबाबा डॉट कॉम ही साईट चीनची असली तरी संपूर्ण आशियात या साईटचा दबदबा वाढत चालला आहे, अलीबाबाने नुकताच रिटेलमध्ये प्रवेश केला आहे.
अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी वांडा ग्रुप कंपनीचे अध्यक्ष वांग जियानलीन यांना मागे टाकले आहे.
वांग यांची संपत्ती सध्या 32.7 अब्ज डॉलर आहे. तर हाँगकाँगचे ली का-शिंग 29.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱया स्थानावर आहेत. असे असले तरी जॅक मा यांचे प्रथम स्थान तात्पुरते ठरण्याची शक्यता आहे. कारण वांग आपल्या एंटरटेनमेंट व्यवसायाला पुनर्गठित करत आहेत.
ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार जॅक मा यांची एकूण संपत्ती 33.3 अब्ज डॉलर म्हणजे 2,178 अब्ज रुपये आहे. जॅक मा यांनी वांग यांना पिछाडीवर टाकले आहे. कंपनीकडून सध्याच जाहीर करण्यात आलेल्या रकमेनंतर जॅक मा यांच्या आर्थिक स्थितीत बदल घडून आला आहे.