वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी पूर्ण झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकट्या न्यूयॉर्क शहरात मतदानासाठी बाराशे पाच मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मतदारांची ओळख पटवण्यासाठी तीन हजार सहाशे स्कॅनिंग मशीन लावण्यात आली असल्याचं अधिका-यांनी सांगितलंय. मतदानासाठी कमीत कमी वेळ लागावा यासाठी 68 हजार वैयक्तिक स्कॅनिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे.  


या प्रक्रियेमुळे मतदानाच्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्रीही न्यूयॉर्कच्या मतदान अधिकाऱ्यांनी दिलीय. 2000 हजार साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी जॉर्ज बुश आणि अल गोअर यांच्यात मतदानाच्या संख्येवरून वाद झाला होता. 


शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथे बुश यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे बोगस मतदानाचे आरोप पुन्हा होऊ नयेत यासाठी नवी प्रक्रिया विकसित करण्यात आलीय.