न्यूयॉर्क : गेला एप्रिल महिना हा गेल्या 137 वर्षातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण एप्रिल ठरलाय. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार 2017 एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान हे एप्रिल महिन्याच्या 1951 ते 1980 या दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या तुलनेत 0.88 अंश सेल्सिअस अधिक होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजतर्फे तापमानाचे दरमहा विश्लेषण करण्यात येतं.  त्यासाठी जगाच्या विविध भागांतील सुमारे 6300 हवामान केंद्रे, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची नोंदी घेतल्या जातात. या नोंदीनुसार गेल्या दोन वर्षात एप्रिल हा सर्वाधिक उष्ण ठरला. एप्रिल 2016 हा सर्वात जास्त तप्त ठरला होता. त्या महिन्याचे तापमान दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या तुलनेत 1.06 अंश सेल्सिअस जास्त होते. 



एप्रिल 2016च्या तुलनेत एप्रिल 2017 हा 0.18 अंश सेल्सिअस थंड होता. तर सन 2010 मधील एप्रिल या कालावधीतील तिस-या स्थानावरील सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला.