वॉशिंग्टन : सौंदर्यस्पर्धांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स एखादी सौंदर्यस्पर्धा जिंकतात आणि मग सिनेक्षेत्रात जाऊन सेटल होतात. पण या सगळ्या कल्पनांना छेद दिलाय मिस युएसएनं. नुकत्याच अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत डेशॉना मिस युएसए ठरली. डेशॉना बार्बर अमेरिकेच्या आर्मीत लेफ्न्ंट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या रॉय, मिस वर्ल्ड, सुष्मिता सेन, मिस युनिव्हर्स, प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड, लारा दत्ता, मिस युनिव्हर्स, डायना हेडन, मिस वर्ल्ड, युक्ता मुखी, मिस वर्ल्ड. यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचे ठरविले. मात्र, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणा-या या सगळ्या ब्युटी क्वीन्स. या सगळ्या मिस युनिव्हर्स किंवा मिस वर्ल्ड होण्याआधी मॉडेलिंग करत होत्या. आणि सौंदर्य स्पर्धांचे किताब जिंकल्यावर सगळ्या जणी सिने क्षेत्रात येऊन अभिनेत्री झाल्या.


ब्युटी पॅजंटस जिंकलं की सिनेक्षेत्रात जायचं, हे जगभरात घडत असावं. पण हे सगळं खोटं ठरवलंय मिस युएसएनं. युद्धभूमी ते फॅशन रॅम्प. असा तिचा प्रवास होता. या मार्गात खूप अडचणी होत्या. पण तिच्या स्वप्नापर्यंतचा प्रवास तिनं जिद्दीनं पूर्ण केला. ही सक्सेस स्टोरी आहे अमेरिकेतल्या डेशॉना बार्बरची.


फक्त सतरा वर्षाची असताना डेशॉना अमेरिकन आर्मीमध्ये रुजू झाली. आर्मीमध्ये उत्तम कामगिरी करत असतानाच ब्युटी क्वीन होण्याचंही तिचं स्वप्न होतं. आणि ते तिनं पूर्णही केलं. एखाद्या लष्करी अधिका-यानं सौंदर्य स्पर्धा जिंकणं, हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय. डेशॉना मिस युएसए ठरलीय. आणि आता ती मिस यूनिवर्ससाठी क्वालिफाय झालीय. डेशॉना सध्या अमेरिकेन आर्मीमध्ये लेफ्ट्नंटच्या पदावर आहे. 


रविवारी अमेरिकेच्या लास वेगासमध्ये हा सोहळा झाला. डेशॉनाच्या या विजयामध्ये महत्त्वाची ठरली ती तिनं दिलेली उत्तरं. "महिलाही पुरुषांइतक्याच खंबीर असतात. मी एक युनिट कमांडर म्हणून सक्षम आहे. स्त्री किंवा पुरुष असणं या आधारावर कुठल्याच मर्यादा अवलंबून नसतात. 


डिस्ट्रिक्ट ऑफ़ कोलंबियामध्ये तैनात असलेल्या लष्करात डेशॉनाचा समावेश आहे. डेशॉनाचे आई-वडील, बहीण आणि भाऊ सगळ्यांनी आर्मीमध्ये काम केलंय. संधी मिळाली तर मला इराकमध्ये लढायला जायला नक्की आवडेल, असं डेशॉना म्हणते. देशासाठी तुम्ही कामी येणं, यासारखं मोठं भाग्य नाही. 


अमेरिकेत महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून युद्धात भाग घेतात. 2012 मध्ये अमेरिकेच्या आर्मीमध्ये फक्त 14 टक्के महिला होत्या.  आज ही संख्या 1 लाख 65 हजार आहे. 35 हजार महिला लष्करी अधिकारी आहेत. आता अमेरिकेत महिला आर्मी रेंजर,  नेव्ही सील्स आणि पॅरा जंपर्सच्या भूमिकाही निभावू शकतात.  


MISS USA चा किताब जिंकल्यावरही डेशॉनाला आर्मीतच राहायचं आहे. आर्मीमधल्या काही गंभीर समस्यांवर तिला काम करायचंय. तणावामुळे जवानांच्या होणा-या आत्महत्या या विषयावर तिचं सध्या संशोधन सुरू आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकूनही आर्मीतच काम करण्याचा डेशॉनाचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.