ऑस्ट्रेलियातही परदेशी नागरिकांसाठी कडक नियम
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही परदेशी नागरिकांसाठी नियम कडक करण्यास सुरूवात केलीये.
कॅनबेरा : अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही परदेशी नागरिकांसाठी नियम कडक करण्यास सुरूवात केलीये. पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी गेल्याच आठवड्यात व्हिसाचे नियम कडक केले होते. त्यानंतर आता कांगारूंच्या देशाचं कायमचं नागरिकत्व मिळवणंही अवघड होणार आहे.
नागरिकत्व मिळवण्यासाठी आता ऑस्ट्रेलियन व्हॅल्यूज ही परीक्षा बंधनकारक करण्यात आलीये. तसंच इंग्रजीची परीक्षादेखील अधिक कठीण असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. याखेरीज ऑस्ट्रेलियामध्ये किमान 4 वर्ष निवास केला असणंही आवश्यक होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा एका वर्षाची होती. याबाबतचं विधेयक लवकरच ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये मांडण्यात येईल.