मेलबर्न : ऑस्ट्रेलिया सरकार २ हजार कांगारूंना संपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्यांना प्रत्यक्षात जीवानिशी संपवलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांगारूंचा देश म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाला आता कांगारूंची संख्या कशी कमी करावी, असा प्रश्न पडला आहे, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करून त्यांची जननक्षमता थांबवण्याचे वा कमी करण्याचे तेथील वन प्रशासनाने ठरवले आहे. 


मात्र तेवढे पुरेसे नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या राजधानी परिसरातील १० अभयारण्यांमध्ये असलेल्या तब्बल १९९१ कांगारूंना मारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


कांगारूंना संपवण्यासाठी एक मोहीमच उघडण्यात येणार असून, रोज संध्याकाळी ही सारी अभयारण्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या काळात कांगारूंना मारण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.