नवी दिल्ली : बांगलादेशने हरकत उल जिहाद अल इस्लामी (हूजी) चा दहशतवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्यांच्या दोन साथिदारांना फाशी दिली आहे. २००४ मध्ये एका दरग्यावर हल्ल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ब्रिटेनचे हायकमिश्नर जखमी झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमन खान यांनी सांगितलं की, हन्नानला गाजीपूरच्या कशिमपूर जेलमध्ये त्याच्या साथिदारांसह फाशी देण्यात आली. रात्री 10:01 मिनिटांनी ही फाशी देण्यात आली. हन्नानचा दुसरा साथिदार देलवार हुसैन रिपोनला सिलहट जेलमध्ये फासी दिली गेली.


गाजीपूरचे एसपी हारुन उर-राशिद यांनी सांगितलं की, हन्नान आणि बिपुनचं पोस्टमार्टम केलं गेलं आणि त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात आला आहे.