बँकॉक : थायलंडमध्ये एका हॉटेलच्या बाहेर भीषण बॉम्बस्फोट झाला आहे आहे. एका कारमध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटनाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हॉटेलच्या इमारतीचं स्फोटात नुकसान झालं आहे. ज्या भागात स्फोट झाला तो बंडखोरांचा भाग मानला जातो.


काही दिवसांपूर्वीच थायलंडमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. थायलंड हा पर्यटनाच्याबाबतीत महत्त्वाचा देश आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटत येत असतात म्हणूनच हे स्फोट केले गेल्याचा प्राथमिक अंदा़ज आहे. या स्फोटांची जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही.